NEET Exam : नीट परीक्षा रद्द होणार? निकालाविरोधात याचिकेवर आज सुनावणी

विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण


नवी दिल्ली : काही दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या रिंगणात पडला आहे. यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीट परीक्षेचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असून आज याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाल्यामुळे परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नीट २०२४ चा पेपर पुन्हा घ्यावा. जर परीक्षा पुन्हा घेतली गेली नाही, तर हा चोवीस लाख मुलांवर अन्याय होईल. भविष्यात आम्हाला पात्र डॉक्टर मिळू शकणार नाही, अशी मागणी नितीन विजय यांनी याचिकेत केली होती.


यापूर्वीही नीट परिक्षेबाबत दाखल झालेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवर कोर्टात सुनावणी पार पडली होती. मात्र त्यावेळी कोर्टाने सगळी परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला. आज पुन्हा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय वेगळे निर्देश देते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परिक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असेही स्पष्ट केले होते. आज पुन्हा उर्वरित दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू