Pushpa 2 movie : पुष्पाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! १५ ऑगस्टला रिलीज होणार नाही 'पुष्पा २'

निर्मात्यांनी नेमका काय निर्णय घेतला?


मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 The Rule) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील नवं गाणं 'द कपन साँग अंगारो' तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. शिवाय टीझरमध्ये दाखवण्यात आलेला पुष्पाचा नवा अर्धनारी अवतार, भेदक नजर आणि श्रीवल्लीचाही नवा लूक यांमुळे 'पुष्पा २'च्या बाबतीत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता मात्र आता रिलीज डेट थेट पाच महिन्यांनी पोस्टपोन करण्यात आली आहे.


'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट आता या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्याशिवाय, रिलीज पोस्टपोन करण्याचे कारणही सांगितले आहे.



का पोस्टपोन केली रिलीज डेट?


पुष्पाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा करताना म्हटले की, आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट कलाकृती देणार. चांगल्या मनोरंजनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करा. 'पुष्पा २: द रुल' आता ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.


काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या एडिटिंगचे काम काही प्रमाणात बाकी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन