Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

Lok Sabha Election: राहुल गांधी देणार राजीनामा आणि वायनाडमधून निवडणूक लढवणार प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

Lok Sabha Election: राहुल गांधी देणार राजीनामा आणि वायनाडमधून निवडणूक लढवणार प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी घोषणा केली की राहुल गांधी(rahul gandhi) केरळची वायनाड लोकसभा सीट सोडून रायबरेली येथील खासदार राहतील. यासोबतच खरगे यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वायनाड येथून निवडणूक लढवणार.

राहुल गांधींनी लोकसभा निवडणूक २०२४मध्ये केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. दरम्यान, कायद्यान्वये त्यांना एक जागा सोडावी लागणार होती. याबाबत सोमवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ते म्हणाले की राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून राजीनामा देतील.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आजच्या बैठकीत हे ठरले की केरळच्या वायनाड मतदारसंघातून आता प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील. रायबरेलीच्या जागेशी गांधी कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे. रायबरेलीच्या लोकांचे आणि पक्षाचे म्हणणे आहे की राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार रहावेत.

वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींना प्रेम मिळाले आहे. मात्र कायदा याला परवानगी देत नाही. यामुळे वायनाड मतदारसंघातून त्यांना राजीनामा द्यावा लागेल. ते रायबरेलीतून खासदार असतील.

Comments
Add Comment