Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, समोर आला हा फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले. एनडीचे सरकार बनल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.


गंभीरने अमित शाहा यांना निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर आपल्या आणि अमित शहा यांच्या भेटीचे फोटो शेअर केले तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात भारत सुरक्षेच्या बाबतीत आणखीन सुधारेल आणि देशात स्थिरता वाढेल.



गौतम गंभीरने राजकारण सोडले?


गौतम गंभीरने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार म्हणून दिल्ली येथून निवडणूक लढवली होती. गंभीरने त्यावेळेस आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना यांना ६,९५,१०९ मतांच्या फरकाने हरवले होते. आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर या माजी क्रिकेटरने २ मार्च २०२४ला घोषणा करताना सांगितले की तो राजकारणातून बाहेर होत आहे. तसेच पुढे केवळ क्रिकेटच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष देईल.


 


भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार?


गौतम गंभीर सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये बोगद्यात भीषण दुर्घटना; 8 कामगारांचा मृत्यू, 19 जण अडकल्याची भीती

Sikkim Landslide : सिक्कीममधील (Sikkim) नामची जिल्ह्यात तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली

E20 Petrol : E20 पेट्रोलवर सरकारची संसदेत स्पष्ट भूमिका; इंजिन खराब झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा

नवी दिल्ली : ई-20 पेट्रोलबाबत (E20 Petrol) सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका

Delhi Protest : दिल्लीतील आंदोलन प्रकरणाला नवे वळण; पाकिस्तान कनेक्शनची चौकशी, ७० जण ताब्यात

नवी दिल्ली : संसद मार्चदरम्यान (Parliament March) राजधानी दिल्लीत झालेल्या आंदोलन (Violence) प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या

Kanpur News : टॅटूचा शौक पडला महागात! काही आठवड्यांत महिला HIV पॉझिटिव्ह; डॉक्टरांचा गंभीर इशारा

कानपूर : टॅटू काढण्याची आवड एका ३२ वर्षीय महिलेला चांगलीच महागात पडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील

President Draupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मू मोल्दोव्हामध्ये दाखल; उपपंतप्रधानांकडून स्वागत

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) सोमवारी मोल्दोव्हा या देशाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर पोहोचल्या.

Supreme Court On Ram Mandir : राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी तपासासाठी एसआयटीची पुनर्रचना करावी - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिरात भाविकांकडून मिळालेल्या देणग्यांमधील अपहार आणि आर्थिक