हार्दिक पांड्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये ९.२८च्या सरासरीने ७ विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या सध्या त्या खाजगी आयु्ष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. असे म्हटले जात आहे की हार्दिक आणि पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यात आलबेल नाही.
काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले गेल की दोघांचा घटस्फोट होऊ शकतो. दरम्यान, या केवळ चर्चा रंगल्या आहे. अद्याप कोणताच दुजोरा मिळालेला नाही.
आता हार्दिक पांड्याने फादर्स डेच्या निमित्ताने खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात हार्दिक आणि त्याचा मुलगा अगस्त्य यांच्यात जबरदस्त बॉडिंग दिसत आहे.
व्हिडिओ क्लिप जुनी आहे. दरम्यान या व्हिडिओत हार्दिकची पत्नी नताशा दिसत नाही आहे. हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले, माझ्या जीवनात इतके प्रेम आणि आनंद आणण्यासाठी धन्यवाद. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी नेहमीच एक प्राऊड फादर राहेन.
सर्बियन मॉडेल नताशा आणि हार्दिक यांनी १३ फेब्रुवारी २०२०मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर दोघांनी ३० जुलै २०२०ला आपल्या पहिल्या मुलांचे स्वागत केले.