Spicejet Airline : हवाई प्रवाशांची मागणी घटल्याने हैदराबाद-अयोध्या विमानसेवा ठप्प!

स्पाईसजेट कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय


नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी स्पाईसजेटने (Spicejet) दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा केली होती. मात्र अयोध्येला जाणाऱ्या हवाई प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे पाहून या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाईन कंपनीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर, जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवीन उड्डाणे सुरु केली होती. परंतु आता प्रवाशांची मागणी घटल्याने स्पाईसजेटने ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादवरून अयोध्येला जाण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. तर या एअरलाइनने आपले अखेरचे उड्डाण १ जून रोजी केले असल्याची माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिली.



मागणीनुसार चालवली जातात विमाने


स्पाइसजेटने हैदराबादहून अयोध्येसाठीची विमान सेवा बंद केली असली तरीही अयोध्या-चेन्नई मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच, व्यावसायिक व्यवहार्यता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उड्डाणे निर्धारित केली जातात, असेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा