Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीधक्कादायक! बोट आढळलेले ‘ते’ आईस्क्रिम पुण्यातील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार झाले?

धक्कादायक! बोट आढळलेले ‘ते’ आईस्क्रिम पुण्यातील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार झाले?

मुंबई : मुंबईतील मालाड भागात राहणाऱ्या २६ वर्षीय डॉक्टर ब्रँडन फेराओ यांनी १३ जून रोजी ऑनलाईन झेप्टो अॅपवरुन दोन मँगो फ्लेवर आणि एक बटरस्कॉच असे तीन Yummo Mango आईस्क्रिम ऑर्डर केले होते. मात्र बटरस्कॉच आईस्क्रिममध्ये त्यांना माणसाचे कापलेले बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांनी या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस कसबन तपास करत आहेत. या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती आईस्क्रीम पुण्यात तयार झाली असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आईस्क्रीमच्या रॅपरवर लक्ष्मी आईस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेड, गाझियाबाद, यूपी असा मॅन्युफॅक्चरिंग पत्ता लिहिला असून ही कंपनी गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी औद्योगिक परिसरात आहे. ही कंपनी YUMMO सह अनेक कंपन्यांसाठी आइस्क्रीम तयार करते आणि संपूर्ण देशभरात पुरवते. मात्र या कंपनीचा मुंबईतील घटनेशी काहीही संबंध नाही अशी माहिती कंपनीचे संचालक यादेश्वर पाल यांनी दिली.

याबाबत माहिती देताना कंपनीचे संचालक यादेश्वर पाल पुढे म्हणाले की, आईस्क्रीम कंपनीचे रॅपर सामान्य झाले असून या रॅपर्सवर सर्व उत्पादन प्रोजेक्टची नावे एकत्र लिहिली जातात आणि प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला एक बॅच कोड असतो. या बॅच कोडने आइस्क्रीम कोणत्या प्लांटमध्ये बनले आहे याची ओळख होते. मुंबईतील ज्या आइस्क्रीममध्ये मानवी बोट सापडले त्याचा बॅच कोड देखील त्याच्या रॅपरवर लिहिलेला असून या कोडनुसार हे आईस्क्रीम पुण्यातील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे.

गाझियाबादच्या लक्ष्मी आईस्क्रीम कंपनीचा बॅच कोड ‘डी’ ने सुरु होतो आणि फॉर्च्यून आणि लक्ष्मी या दोन्ही थर्ड पार्टी कंपन्या आहेत ज्यांच्यासोबत YUMMO ने आइस्क्रीम उत्पादनासाठी करार केला आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Yummo ice cream : कापलेलं बोट आढळलेल्या आईस्क्रिमप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

आमचा या प्रकरणात काहीही संबंध नाही याची पुष्टी YUMMO कंपनीच्या अंतर्गत तपासातही झाली आहे तसेच याबाबत YUMMO कंपनीच्या मालकानेही स्पष्ट वक्तव्य केले आहे. यामुळे पुण्याच्या फॉर्च्युन प्लांटमध्ये हा प्रकार कसा घडला याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

मालाड पोलिसांनी या प्रकरणात YUMMO कंपनीविरुद्ध कलम २७२ (विक्रीसाठी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे), कलम २७३ (हानीकारक अन्नाची विक्री) आणि कलम ३३६ (दुसऱ्याच्या जिवाला धोका निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -