नवी दिल्ली: जी७ शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इटलीमध्ये पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी(Giorgia Meloni) यांनी स्वागत केले. भारत जी७ शिखर परिषदेत आऊटरिच राष्ट्र म्हणून भाग घेत आहे. पंतप्रधान मोदी जी७ आऊटरिच शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी गुरूवारी रात्री उशिरा इटलीच्या आपुलिया येथे पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने शुक्रवारी जी७ शिखर परिषदेत जागतिक नेत्यांसोबत सार्थक चर्चेसाठी खूप उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी७ शिखर परिषदेत आऊटरिस सत्रात भाग घेण्यासाठी आपुलिया येथे पोहोचल्यानंतर हे विधान केले.
जी-७ शिखर परिदषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोडिमिर झेलेस्की यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांना याचा आनंद आहे की सलग तिसऱ्या कार्यकाळात त्यांचा पहिला राजकीय दौरा जी७ शिखर परिषदेसाठी इटलीचा आहे. पंतप्रधान यांनी इटलीच्या आपल्या मागील दौरा तसेच पंतप्रधान मेलोनी यांच्या भारत दौऱ्याच्या आठवणी ताज्या केल्या.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…