Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीNEET-UG 2024 : नीट परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची होणार पुनर्परीक्षा

NEET-UG 2024 : नीट परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची होणार पुनर्परीक्षा

सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : NEET-UG 2024 परीक्षेचा ४ जून रोजी जाहीर झालेला निकाल वादात सापडला आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी पार पडली. परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. ४ जूनच्या निकालाच्या आधारे केले जाणारे कॉउंसलिंग बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. यावर सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

NEET परीक्षा आयोजित करणारी संस्था NTA कडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार (Neet Exam) दिला आहे. समुपदेशन सुरूच राहणार असून आम्ही ते थांबवत नाही. जेव्हा परीक्षा असते, तेव्हा सर्वकाही पूर्णतेनं केलं जातं. अशा परिस्थितीत, पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. १५६३ विद्यार्थ्यांसाठी २३ जून रोजी पुनर्परीक्षा होणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली आहे. यावेळी फेरपरीक्षेची तारीख आजच ठरवली जाईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. एनटीएला दोन आठवड्यांत याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये दिले आहेत.

तर कोर्टाच्या निर्देशानुसार २३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. हे लोक पुन्हा परीक्षेला बसले नाहीत, तर ग्रेस नंबर काढून टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो. या परिक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी निकाल लावला (Neet Result Controversy) जावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. १५६३ विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क हे ग्रेस मार्कांशिवाय दिले जाणार आहेत. बाकी २ याचिकांवर न्यायालयात पुढील दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -