Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

PM Modi: कुवैत आग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, २ लाख रूपये मदतीची घोषणा

PM Modi: कुवैत आग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, २ लाख रूपये मदतीची घोषणा

नवी दिल्ली: कुवैत येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात तब्बल ४९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यात ३० भारतीयांचा समावेश आहे. या घटनेनंतर भारत सरकारने तात्काळ कुवैत सरकारशी संपर्क साधला आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यास सांगितले.


यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवैत शहरात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाहता परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान कुवैतमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूप्रकरणी लोकांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला दरम्यान,


या दरम्यान पंतप्रधानांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबाप्रती शोक तसेच संवेदना व्यक्त केली. यासोबतच जे जखमी आहेत त्यांनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही केली. तसेच या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीमधून देण्याची घोषणा केली. तसेच जखमींना ५० हजारांची घोषणा करण्यात आली.


 


माझ्या संवेदना सर्व लोकांसोबत आहेत - मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, कुवैत शहरात लागलेल्या आगीची दुर्घटना दु:खद आहे. माझ्या संवेदना त्या सर्व लोकांसोबत आहेत ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. मी प्रार्थना करतो की यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत.


कुवैतमध्ये घडलेल्या घटनेनंतर भारत सरकारचे परराष्ट्र राज्य मंत्री किर्तीवर्धन सिंह कुवैतला रवाना झाले आहेत. यातच भारतीय दूतावासाकडून याबाबत आपात्कालीन हेल्पलाईन नंबर (+965-65505246) जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment