प्रहार    

Junaid Khan : जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटावर हिंदू संघटनेचा आक्षेप!

  122

Junaid Khan : जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटावर हिंदू संघटनेचा आक्षेप!

'या' कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी


मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) 'महाराज' (Maharaj) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मात्र जुनैद खानच्या या पहिल्याच चित्रपटावर हिंदू धर्माने आक्षेप घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत वाद निर्माण झाले आहेत. उद्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणास्तव हिंदू संघटनेने जुनैद खानच्या महाराज चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म्सचा 'महाराज' हा चित्रपट १४ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्य अभिनेता जुनैद खान आहे आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Siddharth Malhotra) यांनी दिग्दर्शन केले आहे. मात्र या चित्रपटाचे पोस्टर पाहता एका हिंदू धर्मगुरूला खलनायक दाखवण्यात आल्याचे, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत बजरंग दलाने म्हटले आहे.


कोकण प्रांत बजरंग दलाने सांगितल्यानुसार, या चित्रपटात एका हिंदू धर्मगुरूला खलनायक दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर श्रीकृष्णावरही अशोभनीय कमेंट्स करण्यात आल्या आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून सनातन आणि हिंदू धर्माला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हा चित्रपट १४० वर्ष जुन्या न्यायालयीन खटल्यावर आधारित असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.


त्याचपुढे हिंदू संघटनेने म्हटले की, 'हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आला असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी विश्व हिंदू परिषद आणि संत समाजाच्या शिष्टमंडळाला याची माहिती द्यावी, त्यानंतर याबाबत पुढचा निर्णय घेऊ', असे सांगितले आहे.



हिंदूंच्या भावना दुखावतील


महाराज हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये एका हिंदू धर्माचे चरित्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या जातील असे विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत बजरंग दलाने म्हटले.



निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय


वायआरएफ आणि नेटफ्लिक्स इंडिया हे प्रकरण वाढवू इच्छित नाही. निगेटिव्ह प्रमोशनोपासून वाचण्यासाठी स्टुडिओ पठाण चित्रपटावेळी वापरण्यात आलेली रणनितीचा वापर करत आहे. तसेच सध्या महाराज चित्रपट रिलीज करणे गरजेचे असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

रहस्यमय ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भव्य-दिव्य सेटवर होणार चित्रीकरण

मुंबई: प्रत्येकालाच आयुष्यात एकदा तरी 'घबाड' मिळावं आणि रातोरात श्रीमंत व्हावं असं वाटतं. अशाच एका घबाडाच्या

गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत

इंद्रायणी मालिकेत अंधश्रद्धेविरुद्ध शिक्षणाची लढाई!

मुंबई: लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' मध्ये लवकरच एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त

आई तुळजाभवानी मालिकेत महादेवाकडून जगदंबेला योगविद्येचं ज्ञान!

मुंबई: लोकप्रिय मालिका "आई तुळजाभवानी" मध्ये लवकरच एक रोमांचक आणि आध्यात्मिक अध्याय सुरू होणार आहे. या विशेष

सोनू निगमच्या आवाजातले 'बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

Marathi Movie Song Released: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी

त्या फक्त अमिताभजींच्या पत्नी आहेत म्हणून... कंगना रणौतने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा