'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणा-या गुंडाला नागरिकांनी कोर्टातच धूतले!

बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गुंड जयेश पुजारीला (Jayaesh Pujari) आज बेळगाव मध्ये कोर्टात आणले होते. यावेळी तो कोर्टात सातत्याने 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देत असल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी त्याची कोर्टातच चांगलीच धुलाई केली. दरम्यान जयेश याच्यावर पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचेही आरोप आहेत. तो या प्रकरणी सध्या अटकेत आहे.


जयेश पुजारी सध्या हिंडलगा तुरुंगात आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असता ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या. जयेशच्या घोषणांनी नागरिकही संतापले आणि त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले पण यामुळे काही काळ कोर्ट परिसरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होती..





काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असताना जयेशने लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. तपासणीमध्ये त्याच्या पोटात वायरीचे तुकडे आढळून आले आहेत. मात्र तो ठीक आहे.


बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बेंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते.

Comments
Add Comment

लाल किल्ला ब्लास्ट : 'आत्मघाती' नव्हे, 'अपघाती' स्फोट; तपास कुठे पोहोचला? १० पॉइंट्समध्ये जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण

एक पोस्टर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी केला कट्टरपंथी व्यावसायिकांच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश! जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उध

धरमशाला येथे २१ महिन्यांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामना

नवीन विंटर राई ग्रासने स्टेडियम सजवले धरमशाला : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला जवळजवळ २१ महिन्यांनंतर

दिल्ली स्फोटानंतर कोलकातामध्ये सुरक्षा वाढवली

कोलकाता :  दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, कोलकाता पोलिसांनी ईडन गार्डन्स स्टेडियमवरील सुरक्षा वाढवली आहे आणि भारतीय

जैश-ए-मोहम्मदचे व्हाईट कॉलर नेटवर्क उद्ध्वस्त, २९२३ किलो स्फोटके आणि शस्त्रे जप्त

नवी दिल्ली : सरकार आणि सुरक्षा संस्थांच्या सतर्कतेमुळे हल्ले करण्यास दीर्घकाळ असमर्थता दर्शविल्याने निराश

दिल्ली स्फोटातील ‘त्या’ आय २० कारने कुठून कसा केला प्रवास?

या घटनाक्रमात ही गाडी ठरतेय महत्वाचा फॅक्टर नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी,