मंगफ : कुवेतमधील दक्षिणेकडील मंगफ शहरात बुधवारी एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ५३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात ५ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. ते केरळमधील आहेत.
ही आग कशामुळे लागली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुवेतच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ही आग स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागली. यावेळी बहुतांश लोक झोपलेले होते. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला. औद्योगिक प्लांटमध्ये काम करणाऱ्या लोकांना राहण्यासाठी या इमारतीचा वापर केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत मोठ्या संख्येने मल्याळम भाषिक लोक राहतात. ही आग एवढी भीषण होती की, भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. आतापर्यंत मिळालेल्या माहतीनुसार या घटनेत ४३ लोक जखमी झाले आहेत.
दुखापत झालेल्यांना फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…