T-20 World cup 2024: पाकिस्तानला अखेर विजयाचा सूर गवसला, कॅनडावर ७ विकेटनी मात

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमध्ये(T-20 World cup 2024) आधी यूएसए आणि त्यानंतर भारताकडून पराभव पत्करलेल्या पाकिस्तानची आज कॅनडाच्या संघाविरुद्ध कसोटी होती. या कसोटीत पाकिस्तान खरा उतरला आहे. पाकिस्तानने या सामन्यात कॅनडाला ७ विकेटनी हरवत विजयाला गवसणी घातली. त्यांचा वर्ल्डकपमधील हा पहिलाच विजय आहे.


हा सामना खरंतर पाकिस्तानसाठी करो वा मरो होता. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात नवख्या यूएसएकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने त्यांच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचेच होते. अखेर त्यांना विजयी सूर गवसला.


या सामन्यात कॅनडाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १०६ धावा होत्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान खरंतर मोठे नव्हते. मात्र ते पूर्ण करताना पाकिस्तानला १७.३ षटके खर्च करावी लागली तसेच ३ विकेटही त्यांनी गमावल्या.


१०७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात मात्र संथ झाली. सुरूवातीला पाकिस्तानचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत होते. मात्र सलामीवीर मोहम्मद रिझवान खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने ५३ धावांची खेळी केली. तर कर्णधार बाबर आझमने ३३ धावा केल्या. बाकी फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले.


याआधीने कॅनडाने सलामीवीर आरोन जॉन्सनच्या ५२ धावांच्या जोरावर २० षटकांत केवळ १०६ धावा केल्या होत्या. कॅनडाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नव्हते.

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ