Navi Mumbai news : ऐरोलीत जोरदार पावसामुळे ४० फूट लोखंडी कमान कोसळली!

  167

सुदैवाने जीवितहानी नाही


मुंबई : जोरदार पावसामुळे (Heavy rainfall) सध्या मुंबईकरांची (Mumbaikars) फारच तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) देखील पावसाने जोर धरला आहे. मात्र, त्यामुळे एक दुर्घटना घडली. ऐरोलीत (Airoli) अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फूट लोखंडी कमान कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ३ च्या रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. पावसाचा जोर वाढल्यामुळे ऐरोलीच्या भारत बिजली येथील रेल्वे रुळागत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी कमान कोसळली. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.


ही कमान रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना ताबडतोब संपर्क साधण्यात आला. रस्त्यावर कोसळलेली कमान ही हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कमान हटवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. रस्त्यावर कमान कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. आता या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या