Monsoon 2024 : पेरणीची घाई न करण्याचा हवामान तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना सल्ला

काय आहे कारण?


नागपूर : राज्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण (Monsoon 2024) आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणार्‍या नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पोहोचलेला नाही. अशी परिस्थिती असताना हवामान तज्ज्ञांनी (Meteorologists) शेतकर्‍यांना (Farmers) एक मोलाचा सल्ला दिल्ला आहे. शेतकर्‍यांनी पेरणीची (Sowing) घाई करु नये, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


मान्सूनचे आमगन झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला आणि पेरण्यांना सुरूवात केली. मात्र काही ठिकाणी पाऊस न पोहोचल्यामुळे या भागातील शेतकरी अद्याप मान्सूची प्रतीक्षा करत आहेत. अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली आहे.


विदर्भातील मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणतः १५ जून असली तरी यंदा चार दिवस आधीच पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. तर दुसरीकडे पूर्व विदर्भामध्ये मान्सून सुरू झाला नाही त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी मान्सूची अजूनही प्रतीक्षा करत आहेत.


पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. जोपर्यंत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत समाधानकारक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली