Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीInstagram New Feature : इन्स्टाग्रामचे नवीन फीचर लॉन्च! ब्रँड्सचा फायदा पण यूजर्स...

Instagram New Feature : इन्स्टाग्रामचे नवीन फीचर लॉन्च! ब्रँड्सचा फायदा पण यूजर्स नाराज

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) सातत्याने नवनवीन फीचर्स (New Features) येत असतात. या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म्सवरील विविध फीचर्स हे नेहमीच यूजर्सच्या दृष्टिकोनातून बनवले जातात. या तिन्ही प्लॅटफॉर्म्सची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाकडून हे फीचर्स सादर केले जातात. अशातच मेटाने (Meta) इन्स्टाग्रामवर एक नवे फीचर लॉन्च केले आहे. मात्र या फीचरमुळे यूजर्सकडून नाराजीचा सूर मारला जात आहे. जाणून घ्या नेमके काय आहे ते नवे फीचर.

यूट्यूब, फेसबुक, स्पॉटीफाय अशा अनेक ॲप्सवर स्क्रोल करताना किंवा गाणी ऐकताना स्किप न करता येणाऱ्या जाहिराती पाहाव्या लागतात. तर, यूट्यूब, फेसबुकवर काही जाहिराती आपण स्किपही करू शकतो. पण, काही ॲप्सवर जाहिराती स्किप करणे शक्य नसते. त्यामुळे स्क्रोल करताना थोडा वेळ थांबून ती जाहिरात जबरदस्तीने पाहावीच लागते. आता या ॲप्सच्या यादीत इन्स्टाग्राम ॲपचासुद्धा समावेश झाला आहे.

‘या’ नव्या फीचरचा समावेश

इन्स्टाग्राम सध्या ‘ॲड ब्रेक्स’ (ad breaks) नावाच्या नवीन फीचरची चाचणी करीत आहे. यामुळे वापरकर्त्यांना रील्स किंवा एखादी पोस्ट स्क्रोल करणे सुरू ठेवण्यापूर्वी विशिष्ट कालावधीसाठी जाहिरात पाहावी लागणार आहे. या जाहिरातींमुळे इन्स्टाग्रामला फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो. परंतु याचा अंतिम निर्णय अद्यापही कंपनीवर अवलंबून असेल, असे इन्स्टाग्रामचे स्पोक्स पर्सन मॅथ्यू टाय यांनी म्हटले.

इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्ट स्क्रोल करताना यूजर्सना ‘ॲड ब्रेक्स’ फीचरचा सामना करावा लागणार आहे. म्हणजेच, यूजर्स स्क्रोल करत असताना इन्स्टाग्राम एक काउंटडाउन टायमर स्क्रीनवर दाखवणार आहे. हा टायमर संपेपर्यंत तुम्हाला स्किप न करता ही जाहिरात पाहावी लागणार आहे. त्यामुळे युजर्सना स्क्रोल करून पुढे जाणेही शक्य होणार नाही.

दरम्यान, एका युजरने या फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये टायमरसह ‘ॲड ब्रेक’ चिन्ह दिसत आहे. यूट्यूबप्रमाणे इन्स्टाग्रामवरही आता जाहिरात पाहावी लागणार असल्यामुळे यूजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -