Abdu Rozik : अब्दु रोझिकने लग्नसोहळा केला पोस्टपोन! काय आहे कारण?

म्हणाला, माझ्या उंचीच्या लोकांसाठी...


अबुधाबी : बिग बॉस फेम गायक अब्दु रोझिक (Bigg Boss fame Abdu Rozik) सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात त्याचा साखरपुडा (Engagement) पार पडला, तर येत्या ७ जुलै रोजी तो लग्नबंधनात अडकणार असल्याची त्याने घोषणा केली होती. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन आपल्या होणार्‍या पत्नीला अंगठी घालतानाचे फोटोज शेअर केले होते. मात्र, नुकतेच त्याने हा लग्नसोहळा पुढे ढकलला असल्याची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामागचं कारणही समोर आलं आहे.


अब्दुने शारजाहच्या अमीरा नावाच्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याच्या काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाची घोषणा केली होती. मात्र आता हे लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे अब्दु रोझिकची पहिली टायटल बॉक्सिंग फाइट आहे. ही फाइट ६ जुलै रोजी होणार आहे. अब्दुने सांगितले की, मी कधीच विचार केला नव्हता की अशी संधी मला कधी मिळेल. या वर्षी इतक्या काही गोष्टी घडल्यानंतर आता मला लग्न पोस्टपोन करावे लागले आहे. मला यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षिता मिळेल


अब्दुने पुढे सांगितले की, माझी होणारी पत्नी अमीराने देखील मला या निर्णयासाठी पाठिंबा दिला आहे. माझ्या या निर्णयामुळे दोघांच्या आयुष्यात मोठा बदल होईल असे वाटते. माझ्या उंचीच्या लोकांसाठी ही टायटल फाईट पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. ही फाईट जिंकण्यासाठी माझी ट्रेनिंग सुरू असल्याचे त्याने सांगितले.



आता कधी होणार लग्न?


सध्या तरी लग्नाची कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, बॉक्सिंग फाईटनंतर लग्नाचे सेलिब्रेशन होणार असल्याचे अब्दुने सांगितले. सध्या अब्दुने आपले सारे लक्ष प्रशिक्षणावर केंद्रीत केले आहे. या फाईटनंतर माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळेल असे अब्दुने सांगितले.



अब्दुला नेटकरींनी केलं होतं ट्रोल


अब्दुने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोजमध्ये आपल्या पत्नीचा चेहरा दाखवला नव्हता. यामुळे अब्दुचे अभिनंदल करत असतानाच काही चाहत्यांनी मात्र हा पब्लिसिटी स्टंट (Publicity stunt) असल्याचा आरोप केला होता. त्यातच अब्दुने २० व्या वर्षीच लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी असावं, असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र, हे सगळे तर्कवितर्क अब्दुने फेटाळून लावले. माझ्यासारख्या लहान उंचीच्या लोकांना प्रेम मिळालंय, हे काही लोकांना बघवत नाही, असं तो म्हणाला होता.



कोण आहे अब्दु रोझिक?


ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने गायलेली 'ओही दिली जोर', 'चकी चकी बोरॉन' आणि 'मोदर'ही गाणी प्रसिद्ध आहेत. मात्र, 'बिग बॉस १६' मध्ये आल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात त्याचे फॅन फॉलोईंग खूप वाढले. यानंतर, तो सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकला होता. त्याशिवाय, २०२३ मध्ये तो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी १३' मध्येही सहभागी झाला.


Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,