यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरोडेखोरांनी एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३० लाखांची रोकड आणि २० तोळे सोनं लुटल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या महागांव तालुक्यातील (Mahagaon Taluka) चिल्ली ईजारा (Chilli Ijara) येथील जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा (Armed robbery) टाकण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागांव तालुक्यातील सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबातील संतोष पांडे हे शेतकरी असून महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. जंगलात त्यांचा एक मोठा वाडा आहे. तसेच त्यांची वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पांडे कुटुंबाने कापूस विकला होता. कापूस विकून मिळालेली रक्कम आणि घरातील सोनं असा ऐवज पांडे कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवण्यात आला होता.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६ दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या साहाय्यानं वाड्यात घुसले. संतोष कुमार पांडे यांच्या सोबत त्यांची बहीण कु. कृष्णा मनोहर पांडे (३५) आणि सौ. सविता सुभाष तिवारी (४९) रा. नागपूर, ह्या काल रात्री घरात मुक्कामी होत्या. दरोडेखोरांनी सर्वात आधी संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली. बंदूक आणि त्यानंतर तलवारीच्या धाकावर दरोडेखोरांनी घराची झाडाझडती घेत ३० लाखांवर रोख रक्कम आणि १७० ग्राम सोन्यांचे दागिने असा ३८ लाख ५० हजाराचा ऐवज लुटून नेला. यात संतोष पांडे यांची बहीण करिष्मा पांडे, सविता तिवारी यांना जबर मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबियांच्या घरावर ज्या दरोडेखोरांनी दरोडा घातला, ते सर्व दरोडेखोर हिंदी आणि मराठीत बोलत होते, अशी माहिती पीडित कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकाराची तक्रार पांडे कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानकात दिली.
घटनेचं गांभीर्य ओळखून महागावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव याप्रकरणी कसून तपास करत आहेत. पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस आधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यासह डॉग युनिट, फिंगर प्रिंट यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…