IND vs PAK: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन, भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेले होते न्यूयॉर्कला

मुंबई: क्रिकेट जगतासाठी दुख:दायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्यासोबत एमसीएचे अजिंक्य नायक आणि एपेक्स काऊंसिल मेंबर सूरज समतही उपस्थित होते.


अमोल काळे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अमोल हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळचे संबंध होते.



अमोल काळे यांचे मोठे निर्णय


अमोल काळे यांना २०२२मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे स्टेडियमने यशस्वीपणे २०२३चा वनडे क्रिकेट वर्ल्डकपचा शेवटचा सामना आयोजित केला होता. इतकंच नव्हे तर अंडर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही मुंबईच्या संघाने यश मिळवले होते. नुकतेच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या हंगामात फायनलमध्ये विदर्भला १६९ धावांनी हरवत ट्रॉफी जिंकली होती. अमोल यांच्या नेतृत्वातच डोमेस्टिक खेळाडूंचा पगार डबल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळाही उभारला होता. अमोल काळे अनकदा लाल बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यााबाबत बोलत असतं. त्यांनी मुंबईच्या संघाला रणजी चॅम्पियन बनल्यानंतर ५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले होते. ते मूळचे नागपूरचे होते. एक दशकापूर्वी ते मुंबईला शिफ्ट झाले होते.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे