न्यूयॉर्क: न्यूयॉर्कच्या नसाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय गोलंदाजांनी जादुई कामगिरी करताना टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध ६ धावांनी विजय मिळवून दिला. टॉस हरवल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित ब्रिगेडला केवळ ११९ धावा करता आल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची धावसंख्या एक काळ १३व्या षटकापर्यंत २ बाद ७३ इतकी होती. यावेळी पाकिस्तान सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी बाजी परतून लावली. १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला केवळ ११३ धावाच करता आल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने ३ आणि हार्दिक पांड्याने २ विकेट मिळवल्या.
सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. बुमराहने ४ षटकांत १३ धावा देत तीन विकेट मिळवल्या. तर हार्दिक पांड्याने फखर जमां आणि शादाब खान यांना बाद करत कमबॅक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंह आणि अक्षऱ पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळवलाय अर्शदीपने सामन्याती शेवटची ओव्हर टाकली होती. यात पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या.
याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात चांगली झाली नव्हती. दुसऱ्याच षटकांत विराट कोहलीची विकेट गमावली होती. कोहली ४ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर रोहित आफ्रिदीच्या बॉलवर आऊट झाला. यानंतर अक्षर पटेल आणि पंतने तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची सर्वाधिक भागीदारी केली. मात्र पटेल मोठा शॉट मारण्याच्या नादात बोल्ड झाला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…