आनंदाचे क्षण | |
मान-सन्मान | |
उत्तम कालावधी | |
सहकार्य मिळणार | |
यश, कीर्ती मिळेलसिंह : आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय चांगले काम करणार आहे. त्यामुळे इतर व्यक्ती तुमचा आदर्श ठेवतील आणि आपला सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. ज्या व्यक्ती खेळाडू आहे, त्यांना अतिशय चांगले यश मिळणार आहे. मैदानी खेळाचे प्रदर्शन त्यांचे अतिशय उत्तम होणार आहे.त्यांची खूप प्रशंसा होणार आहे. कुटुंबामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असणार आहे. नातेवाइकांकडून एखादी आनंदाची बातमी समजणार आहे. यश आणि कीर्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी येतील. | |
संमिश्र घटनाकन्या : हा सप्ताह संमिश्र घटनांचा आहे.आरोग्याच्या किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. तुमच्या मार्गामध्ये कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. कुटुंब स्थानातील शुभग्रह आपल्याला खूप चांगली फळे देणार आहे.नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. आपल्या कार्यात चांगली प्रगती होईल. आपण नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. हुशारीने गुंतवणूक कराल. | |
शत्रूंचा बिमोडतूळ : शुभग्रहांची साथ त्यामुळे अतिशय अनुकूल काळ. आपल्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे सोडवल्या जाणार आहे. शत्रूंचा बिमोड होणार आहे. समाजामध्ये तुमची पत वाढणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्ही मिळवलेली कंत्राटी आणि करार यातून चांगला फायदा मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपण नवीन व्यवहार करू शकता. नवीन कामे सुरू करू शकता. हे व्यवहार आपणास अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे. वाहन खरेदीचे योग आहेत. उत्तम कालावधी. | |
जीवन सकारात्मक राहणारवृश्चिक : स्वतःला व्यक्त करण्यासाठी, हा काळ अतिशय चांगला आहे. आपल्या सर्व क्षमतांचा चांगला वापर करण्यासाठी चांगला काळ आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगला बदल होण्याची शक्यता आहे. आपणास त्यातून आर्थिक फायदे चांगले मिळतील. वरिष्ठ व अधिकारी यांची कृपादृष्टी असणार आहे. आपला कल्पक दृष्टिकोन आणि संधी यांमुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यांमुळे तुमचे जीवन सकारात्मक राहणार आहे. उद्योगाची कालावधी उत्तम. | |
कष्टाचे चीजधनु : हा कालावधी आपणास मिश्र घटनांचा राहणार आहे. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तींना आकर्षक करून घेऊ शकाल. ज्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी साहाय्य करण्यास तयार असतील. त्यामुळे तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी तुम्हाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. मात्र भावंडांमध्ये काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग येऊ शकतात. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. | |
आर्थिक आवक वाढेलमकर : तुमची कष्ट करायची तयारी असल्यामुळे, हा काळ तुम्हाला निश्चित चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे बदल आपणास फायदेशीर ठरतील. आपली निर्णयक्षमता अतिशय चांगली असणार आहे. तुमची आर्थिक आवक निश्चितच वाढणार आहे. भाग्यातील शुभग्रहांमुळे आपल्या कष्टाचे चीज होणार आहे.शंकास्पद व्यवहार निश्चितच टाळा. आपल्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तीकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. घराचे, बांधकामाचे काही काम असल, तर ते या काळामध्ये करून घ्या. | |
तीर्थक्षेत्राला भेटकुंभ : हा सप्ताह आपणास मिश्र घटनांचा असणार आहे. तुमचा पैसा बऱ्याच ठिकाणी अडकल्यामुळे, रोख रकमेची कमतरता भासू शकते.आरोग्याच्या तक्रारी तोंड वर काढू शकतात. दशमातील ग्रहांमुळे वरिष्ठांबरोबर संवाद चांगला राहील. तुमच्या मनात अनेक नवनवीन कल्पना येत असतील; पण त्याचा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंचा विचार करा. नंतर अमलात आणा. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ चांगला होईल. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता. वाहन खरेदीची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. | |
निश्चित यशमीन : आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे.तुम्ही स्वतःच्या अडचणींवर मात करणार आहात. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळणार आहे.अतिआत्मविश्वास टाळा.व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही प्रगती करणार आहात. उद्योग आणि व्यवसायामध्ये समृद्धी लाभणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवनवीन प्रकल्प समोर येतील, नीट विचार करून स्वीकारा. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांमध्ये निश्चित यश येणार आहे भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. |
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…