Mumbai airport : एका विमानाचं उड्डाण तर दुसऱ्याचं लँडिंग! मोठी दुर्घटना होता होता टळली...

मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत झाली मोठी चूक


मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याने हा प्रकार घडला. एकाच धावपट्टीवर दोन विमानांना परवानगी देण्यात आली, मात्र दोन्ही विमाने काहीशा वेळेच्या फरकाने जवळ आल्याने हा अपघात टळला. समोर आलेल्या माहितीनुसार, काल सकाळच्या सुमारास इंडिगोचे (Indigo) विमान रनवेवर उतरत होते, तर एअर इंडियाचे (Air India) विमान टेक ऑफ करण्यासाठी रनवेवर धावत होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ बाहेर आला आहे.


एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला होता. एअर इंडियाचं विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लैंडिंग होत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट ५०५३ रनवे क्रमाक २७ वर उतरणार होते. त्याचवेळी एअर इंडियाची फ्लाइट ६५७ टेक ऑफ करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ही टक्कर वाचली. एअर इंडियाचे विमान है तिरुअनंतपुरमसाठी उड्‌डाण करणार होते अशी माहिती समोर आली आहे.


मुंबई विमानतळावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एअर इंडियाचे विमान रनवेवर वेगाने जात होते, तर त्याचवेळी इंडिगोचे विमान लैंडिंग करत असल्याचे दिसत आहे. मात्र, जेव्हा इंडिगोचे विमान एअर इंडियाच्या विमानाजवळ आले तोपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केले होते. त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे, असे व्हिडीओत दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.


रन वे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन