T-20 world cup 2024: पाकिस्तानचा भेदक मारा, भारताचा डाव ११९ वर आटोपला

Share

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलावले. मात्र पाकिस्तानचा हा डाव यशस्वी ठरला.

पाकिस्तानने असा भेदक मारा केला की भारताचा डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. भारताकडून विकेटकीपर ऋषभ पंतने ४२ धावा करत निकराचा लढा दिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. पंतपाठोपाठ अक्षरने २० धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने १२ धावा केल्या. भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत.

पाकिस्तानच्या नसीम शाहने आणि हरिस रौफने जबरदस्त गोलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना एकामागोएक बाद केले. त्यांनी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावा हव्या आहेत.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

5 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

5 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

5 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago