Thursday, July 4, 2024
HomeदेशUnion Ministers : दिल्लीतून महायुतीच्या 'या' पाच खासदारांना मंत्रिपदासाठी ग्रीन सिग्नल!

Union Ministers : दिल्लीतून महायुतीच्या ‘या’ पाच खासदारांना मंत्रिपदासाठी ग्रीन सिग्नल!

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी कोणाकोणाची लागणार वर्णी?

नवी दिल्ली : देशात एनडीए (NDA) तिसर्‍यांदा सत्तास्थापन करणार असून आज संध्याकाळी सव्वासात वाजता नव्या मंत्रिमंडळाचा (Cabinet) शपथविधी सोहळा (Oath taking ceremony) पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदासाठी (Union Ministers) कोणाकोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. आता दिल्लीतून महायुतीच्या कोणत्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे, याची माहिती समोर आली आहे. यात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) संधी मिळाली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत (Ajit Pawar’s NCP) मात्र संभ्रम कायम आहे.

आजच्या शपथविधी सोहळ्यात विविध राज्यातील एनडीएमधील घटकपक्षांचे नेते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यात महायुतीचा घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाला एक मंत्रीपद देण्यात येणार आहे. आज सकाळी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. तसेच भाजपच्या खासदार रक्षा खडसे, पियुष गोयल, नितीन गडकरी, यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार की नाही?

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, प्रफुल पटेल यांना अजूनही कोणताही फोन गेलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. मात्र, अजूनही त्यांना मंत्रिपदाबाबत फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवार गट मंत्री पदासाठी अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.

मंत्रीपदे देताना प्रादेशिक समतोल राखण्याचाही विचार

राज्यामध्ये मंत्रीपदे देत असतानाच प्रादेशिक समतोल राखला जाणार आहे. याचा विचार केल्यास विदर्भातून नितीन गडकरी हे मंत्रीपदी असतील, तर मुंबईतून पियुष गोयल असणार आहेत. रामदास आठवले जातीय समीकरणातून मंत्रीपदी असतील, तर उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातून मंत्रीपद दिले जाते का? याकडे सुद्धा लक्ष आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -