Delhi Fire : अग्नितांडव! दिल्लीतील फूड फॅक्टरीला भीषण आग

तिघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी


नवी दिल्ली : उन्हाच्या कडाक्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशाची राजधानी दिल्ली येथेही अशीच एक घटना घडली आहे. दिल्ली येथील (Delhi) नरेला परिसरातील एका फूड फॅक्टरीला (Food Factory) आज पहाटे भीषण आग (Fire News) लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या अग्नितांडवामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी डाळ भाजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी आला. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. मात्र काही कामगारांना वेळीच बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत अनेक कामगार अडकले होते. परंतु अग्निशमन दलाच्या विभागाकडून (Fire Brigade) अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे.



जखमींची माहिती


अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये श्याम (२४), राम सिंग (३०) बीरपाल (४२)या तिघांना मृत घोषित केले. आणि इतर ६ कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर एसएचआरसी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.


दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचे समोर आले आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील