मुंबई : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडा (Mhada) आणि सिडकोकडून (CIDCO) उपलब्ध होणाऱ्या घरांची वाट पाहात असतात. अशातच मुंबईत घर घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती मिळत आहे. म्हाडा मुंबईत (Mumbai) घरे उभारण्याच्या तयारीत असल्यामुळे आता सर्वसामान्यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून दरवर्षी घरांची लॉटरी काढली जाते. म्हाडाच्या इतर मंडळाच्या तुलनेत मुंबईमधील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी म्हाडाने मुंबईत ४,०८२ घरांची लॉटरी काढली होती. यामध्ये तब्बल १ लाख २२ हजार अर्ज प्राप्त झाले होते. आता या आर्थिक वर्षात म्हाडा मुंबईत ३,६०० घरे उभारण्याचे नियोजन केले आहे. मुंबई शहरासह उपनगरातही घरे असणार आहेत. यामध्ये अॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, मागाठाणे, पहाडी गोरेगाव अशा विविध ठिकाणी ही घरे असणार आहेत.
म्हाडाच्या प्रत्येक मंडळाकडून वर्षभारत किमान एक लॉटरी काढली जाते. त्यानुसार या आर्थिक वर्षात मुंबईसह पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती येथे सुमारे १२ ते १३ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…