Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास कोण होणार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री?

  214

'या' पाच नेत्यांच्या नावाची चर्चा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election results) महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. यानंतर दुसर्‍याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व पराभवाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, याबाबत भाजपच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे, तर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील फडणवीसांसोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. या चर्चेत फडणवीसांच्या राजीनाम्यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


महाराष्ट्रात यंदा भाजपचं वर्चस्व कमी झाल्याचं दिसून आलं. आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शुन्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत. ते राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही, अशी इच्छा त्यांनी अमित शाहांजवळ बोलून दाखवली. त्यावर अमित शाह यांनी राजीनामा न देता काम सुरु ठेवण्याचा सल्ला फडणवीसांना दिला आहे. मात्र, फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीसाठी अमित शाह, राजनाथ सिंह पोहोचले आहेत, तर अजित पवार, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे देखील बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.



उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची चर्चा?


दरम्यान, दिल्लीत आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच चर्चेत आलं आहे. फडणवीस जर आपल्या निर्णयावरुन मागे हटले नाहीत, तर त्या ठिकाणी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात गिरीश महाजनांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी कायम गिरीश महाजन (Girish Mahajan) असतात. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांची पक्षाचे संकटमोचक व संयमी नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. कुठली अडचण असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाते. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर समतोल साधणारा नेता म्हणून गिरीश महाजन हे परफेक्ट असू शकतात, अशी चर्चा आहे.


याशिवाय महाराष्ट्रातील आणखी चार नेत्यांची नावे देखील उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार व विनोद तावडे यांच्या नावांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले