Hamare Baarah : उच्च न्यायालयाकडून 'हमारे बारह' चित्रपटाला हिरवा कंदील!

'या' तारखेला होणार चित्रपट प्रदर्शित


मुंबई : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर त्याचा आगामी 'हमारे बारह' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रसारणाला उच्च न्यायालयाने आक्षेप टाकला होता. यामध्ये मुस्लिम समाजाचे चुकीचे चित्रीकरण करण्यात आल्याचा दावा केल्यामुळे चित्रपटाबाबत वादग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता ते प्रकरण निवळले असून मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'हमारे बारह' चित्रपटामध्ये दाखवलेल्या चुकीच्या संवादामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तसेच हा चित्रपट प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करावा, अशी याचिका दाखल केली होती. याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्याला चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवण्याची हमी दिली. त्यानंतर आज दिवसभरात चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवल्यानंतर उद्यापासून संपूर्ण देशभरात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी खंडपीठानं दिली आहे.



नेमके प्रकरण काय?


निर्मात्याने चुकीचे चित्रीकरण केले आहे. मुस्लिम समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणमधील आयत क्रमांक २२३ चा दाखला देऊन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेले सर्व संवाद पूर्णतः चुकीचे असल्याने या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने याप्रकरणाची न्यायालयात दाद मागण्यात आली.



सुनावणीदरम्यान काय घडले?


मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या तीन सदस्यांच्या समितीने हा चित्रपट पाहावा आणि अहवाल द्यावा, असे निर्देश दिले होते. त्या समितीमध्ये नागराज रेवणकर, इशरत सय्यद, निलांबरी साळवी यांचा समावेश होता. या समितीने काल सायंकाळी चित्रपट पाहिला आणि या चित्रपटासंदर्भात अंतरीम निरीक्षण नोंदवले.


समितीने अंतिम अहवाल देण्यासाठी किमान १२ जून पर्यंतचा वेळ मिळावा, अशी मागणी उच्च न्यायालयाला केली. मात्र, सेन्सॉर बोर्डाच्या समितीच्या अहवालासाठी चित्रपटाचे प्रदर्शन रोखू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले.

Comments
Add Comment

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Aamir khan 3rd wedding: मुसळधार पावसामुळे अंबानी कुटुंबाचा ताफा काही काळ थांबला; आमिर खानच्या विवाह सोहळ्यासाठी जाताना घडली घटना

मुंबई : रविवारी मुंबईत दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला.

Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, 'ते' दोन खास मित्र चर्चेत

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'(Mr. Perfectionist) आमिर खान ५ जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची बदनामी? आक्षेपार्ह थंबनेल वापरणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सचिन गोस्वामी संतप्त!

मुंबई : लोकप्रिय विनोदी कार्यक्रम (Comedy Show) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' संदर्भात सोशल मीडिया (Social Media) आणि युट्यूब (YouTube) वर

Lock Upp 2 : राम कपूरच्या 'त्या' एका वक्तव्यावर कंगना भडकली! भर शोमध्ये अभिनेत्याला सुनावले खडेबोल; पाहा नेमकं काय घडलं...

Lock Upp 2 : लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram kapoor) सध्या 'लॉकअप २' (Lock UPp 2) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये केलेल्या काही