जाणून घ्या तुमची रास आहे का यात…
मुंबई : वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेवाच्या राशीमधील परिवर्तनामुळे (Surya Gochar) त्या राशीच्या व्यक्तीचे जीवन उजळू शकते. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर संक्रमण करतात. त्यानंतर सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्यदेखील प्रत्येक महिन्यात राशीत (Horoscope) परिवर्तन करतो. जून महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार काही राशींना या गोष्टीचा फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १५ जून रोजी रात्री १२ वाजून १६ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत संक्रमण केल्याने काही राशींवर याचा चांगला परिणाम होणार आहे. तर, काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा मेष राशीच्या पंचम चरणाचा स्वामी आहे. सूर्याचा तिसऱ्या चरणात प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. त्यासोबत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
सूर्य मिथुन राशीच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनाही याचा चांगलाच लाभ होणार आहे. पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती चांगली राहण्याचा अंदाज आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, करिअरमध्ये देखील चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. या कालावधीत तुम्ही परदेशी जाण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या व्यवहारात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.