Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीShivrajyabhishek : शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ला दुमदुमला!

Shivrajyabhishek : शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ला दुमदुमला!

महाराजांना वंदन करण्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज रायगडावर (Raigad Fort) मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन साजरा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी सकाळपासूनच रायगडावर मोठी गर्दी केली आहे. यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले शिवप्रेमी येथे जमतात. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या दर वर्षी वाढत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यांच्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने सोयी-सुविधांची सज्जता केली आहे. तसेच, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

प्रशासनाने शिवभक्तांसाठी केल्या या विशेष सुविधा

  • प्रशस्त पार्किंगपासून एसटी बस, दिशादर्शक फलक आणि मदतीसाठी स्वयंसेवक तयार ठेवण्यात आले आहेत. पायरीमार्गे गडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या सुविधेसाठी प्रशिक्षित ट्रेकर्स सज्ज असणार आहेत. रुग्णांवर आपत्कालीन उपचारांसाठी डॉक्टर व वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात आले आहे.
  • सर्पदंश किंवा विंचूदंशापासून सुरक्षितेसाठी सर्पमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उष्णतेचा विचार करता गड परिसरात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनव्यवस्था असून, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रक्षेपण सर्व वाहिन्या व सोशल मीडियावर उपलब्ध करण्यात येणार आहे. गड परिसरात एलपीडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
  • या सोहळ्यासाठी सुमारे १५० पोलिस अधिकारी व एक हजार ६०० कर्मचारी, चार वाहतूक पोलिस अधिकारी व १५९ कर्मचारी, एसआरपी, एसबीआर, रायगड पोलिस दंगलनियंत्रण पथक, स्थानिक बचाव पथक व स्वयंसेवक हजर असणार आहेत. यासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. या सर्वांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -