Isarel Hamas War : इस्त्रायल हमासची दंगल सुरुच! रफाह नंतर गाझामधील शाळेवर नरसंहार

लहान मुलांसह ३० जणांचा मृत्यू


जेरुसलेम : काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलने (Isarel ) रफाह (Rafah) शहरावर हल्ला केला होता. त्यामध्ये ४५ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २०० हून अधिक जण जखमी झाले होते. हे प्रकरण ज्वलंत असतानाच इस्त्रायलने गाझा येथे हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. इस्त्रायल-हमासची (Isarel Hamas War) दंगल अजूनही सुरुच असल्याने या गोष्टीचा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यासोबत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायल लष्कराने गाझामधील शाळेवर बॉम्ब हल्ला केला आहे. या शाळेमध्ये अनेक पॅलिस्टिनी नागरिक आश्रय घेत होते. इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने या शाळेच्या तीन वर्गांवर हल्ला केला. त्यामुळे या वर्गातील अनेक लहान मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.



नरसंहार गुन्ह्याची जबाबदारी घेणे गरजेचे


इस्त्रायली सैन्याने केलेल्या या हल्ल्यावर हमासने निषेध व्यक्त केला आहे. हा एक भयानक नरसंहार असल्याचे म्हटले जात आहे. इस्त्रायल सैन्याने हे हल्ले चालू ठेवणे म्हणजे नरसंहार गुन्हा करणे आहे. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या या गुन्ह्यांची जबाबदारी इस्त्रायल आणि अमेरिकेने घेतली पाहिजे, असे गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने म्हटले आहे.


दरम्यान, इस्त्रायलने यापूर्वी रफाह शहरावर केलेल्या हल्लामुळे अनेक लोकांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त केला होता. त्याबाबत सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह' (All Eyes On Rafah) असा ट्रेंडदेखील सुरु होता. मात्र आता पुन्हा गाझामधील शाळेवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर