न्यूयॉर्क: भारत आणि आयर्लंड(india vs ireland) यांच्यात आज टी-२० वर्ल्डकपचा(t-20 world cup 2024) सामना रंगत आहे. भारताने या सामन्यात टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी अतिशय योग्य ठरवला.
भारताच्या गोलंदाजांनी इतका तिखट मारा केला की आयर्लंडचे फलंदाज शंभर धावाही पूर्ण करू शकले नाहीत. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल या पंचकाने जबरदस्त मारा करताना आयर्लंडचा डाव मोडून काढला.
आयर्लंडला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ इतक्याच धावा करता आल्या. सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत हा सामना खेळत आहे.
आयर्लंडने १६ षटकांत केवळ ९६ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी केवळ ९७ धावांचे आव्हान आहे. आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.