Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना धक्का! अंतरिम जामीन अर्ज फेटाळत तुरुंगवासातही वाढ

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लँड्रिंगचा आरोप आहे. त्या प्रकरणी ते दीड महिना तुरुंगात होते. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी त्यांचा २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. हा अंतरिम जामीन (Interim Bail) संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले. मात्र, त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळत केजरीवालांच्या तुरुंगवासात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांसाठी हा मोठा धक्का आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. राऊज ॲव्हेन्यूच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ केली आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव ७ दिवसांच्या जामीनासाठी अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली अंतरिम जामिनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. असे असले तरी न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.


ईडीकडून अंतरिम जामिनास जोरदार विरोध


यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला होता. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाच्या काळात वैद्यकीय चाचण्यांऐवजी प्रचारसभांना संबोधित केले असून ते आजारी नाहीत हे स्पष्ट दिसून येत होते. तसेच त्यांचे वजन सात किलोंनी घटले नसून एक किलोने वाढल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा केजरीवालांना दिलासा मिळाला नाही.

Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी