Chandrababu Naidu : इंडिया की एनडीए? चंद्राबाबूंच्या निर्णयाने फासे फिरणार?

चंद्राबाबूंनी जाहीर केला मोठा निर्णय 


नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाला असून या एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपा किंवा काँग्रेसपैकी एकही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकलेला नाही. त्यामुळे यंदा सत्तास्थापनेच्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. त्यातच चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे फासे फिरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


चंद्राबाबू नायडू यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. चंद्राबाबू यांनी त्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्येच राहणार आहे. तसेच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच आपण आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला २४० जागा जिंकण्यात यश आलं असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९४ जागा जिंकल्या आहेत. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष १६ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्तास्थापनेमध्ये आणि पुढील सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना