Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Devendra Fadnavis : ‘लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो; मला सरकारमधून मुक्त करा’

Devendra Fadnavis : ‘लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो; मला सरकारमधून मुक्त करा’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी


मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच, मला आता सकारमधून मोकळे करा, अशी विनंती मी भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच संविधान बदलणार या नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला याची कबुली देखील यावेळी फडणवीस यांनी दिली.


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.


फडणवीस म्हणाले की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे आणि नेहरुजींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपाने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू, असे फडणवीस म्हणाले.



नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला. प्रचारादरम्यान निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका देखिल आम्हाला बसला. यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकार मधून मोकळे करावे, अशी मागणी केली.


आम्हाला २०२९ मध्ये २७.८४ टक्के मत आणि २३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी दीड टक्का कमी मतदान मिळाले आणि नऊ जागा मिळाल्या. आम्हाला लोकांनी नाकारले नाही, असे देखील फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment