Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला अंतरवाली सराटी ग्रामस्थांचाच विरोध

काय आहे कारण?


जालना : अवघ्या देशाची नजर लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) उद्या म्हणजेच ४ जून रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काही दिवसांपूर्वी ४ जूनपासूनच पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. देशभरात निकालाची धामधूम सुरु असतानाच उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाला कायम पाठिंबा देत आलेल्या अंतरवाली सराटीतील (Antarwali Sarathi) ग्रामस्थांनीच या उपोषणाला विरोध दर्शवला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तसं निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवलं आहे. त्यामुळे हा मनोज जरांगेंसाठी मोठा धक्का आहे.


गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात 'गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये', अशी मागणी केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे.


ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार