मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आपल्या सिनेमांसोबतच पर्सनल लाईफमुळे सातत्याने चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी खबर आली होती की अदा सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहे. आता ही बातमी खुद्द अदाने कन्फर्म केली आहे. तिने सांगितले की चार महिन्यांपूर्वी ती या घरात शिफ्ट झाली होती. सोबतच तिने हे ही सांगितले की नव्या घरात तिला कसे वाटत आहे.
एका मुलाखतीत तिने आपल्या या निर्णयाबद्दल सांगितले. अदा म्हणाली, मी चार महिन्यांपूर्वी फ्लॅटमध्ये राहण्यास आली होती. मात्र बस्तर आणि द केरल स्टोरी ओटीटी रिलीज आणि काही प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी मथुरामध्ये हाथी सेंच्युरीमध्ये काही वेळ घालवला. नुकतीच मला काही वेळाची सुट्टी मिळाली आहे आणि अखेर मी येथे शिफ्ट झाले आहे.
मी माझ्या आयुष्यात पाली हिल या एकाच ठिकाणच्या घरात राहिली आहे आणि हे पहिल्यांदा झालेय की मी तेथून बाहेर आले आहे. येथील वाईब्स खूप संवेदनशील आहेत. येथे मला सकारात्मकता मिळते. केरळ आणि मुंबईतील आमची घरे झाडांनी घेरलेली आहेत.
घराचा बदलला लूक
अदाने हे घर ५ वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे. या घरात राहण्यासोबतच तिने संपूर्ण ट्रान्सफॉर्म केले आहे. तिने संपूर्ण अपार्टमेंट व्हाईट कलरने पेंट केले. सोबतच खालच्या मजल्यावर मंदिर बनवले आहे. वरच्या मजल्यावर एक म्युझिक रूम, डान्स स्टुडिओ आणि छताला गार्डन सेंच्युरीमध्ये बदलले आहे.