Preity Zinta : प्रीती झिंटाची सहा वर्षानंतर बॉलीवुडमध्ये धमाकेदार एंट्री!

पोस्ट शेअर करत दाखवली 'लाहोर १९४७'ची झलक


मुंबई : दमदार अभिनय आणि उत्तम व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेली प्रीती बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. आता ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान निर्मित 'लाहोर १९४७' (Lahore 1947) या चित्रपटातून दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच प्रीतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने 'लाहोर १९४७'ची स्क्रिप्ट आणि चित्रपटाच्या टीमची झलक दाखवली आहे.



प्रीती झिंटाने शेअर केली पोस्ट


प्रीती झिंटाने हा सर्वात कठीण चित्रपट असल्याचेही या पोस्टद्वारे सांगितले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, 'लाहोर १९४७'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. या अद्भुत अनुभवासाठी मी संपूर्ण कलाकार आणि क्रूचे आभार मानते. मी मनापासून आशा करते की, तुम्ही सर्वजण या चित्रपटाचे कौतुक कराल. आम्हाला हा चित्रपट बनवताना जितका आनंद मिळाला तितकाच तुम्ही देखील घ्याल. माझा हा आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. आमिर, सनी, शबाना जी, संतोष सिवान आणि ए .आर. रहमान यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनी पोस्टवर कंमेट करून चित्रपटाविषयी उत्सुक असल्याचे सांगितले आहे.




Comments
Add Comment

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता

तारा सुतारीया आणि वीर पहारिया यांच्या ब्रेकपची रंगली चर्चा, सोशल मीडियावर एकमेकांना केले...

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारीया आणि वीर पहारिया हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल एकमेकांना वर्षभरापासून डेट