Monday, November 11, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Monsoon : मान्सून आगमनापूर्वी महा-मुंबई मेट्रो सज्ज!

Mumbai Monsoon : मान्सून आगमनापूर्वी महा-मुंबई मेट्रो सज्ज!

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना

मुंबई : पावसाळा (Monsoon) सुरु झाला की सर्वांना त्याचा आनंद होतो, मात्र पावसात गाड्यांना होणारा विलंबामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यंदा मुंबईकरांना पावसाळ्यात कसलाही त्रास सहन करावा लागू नये यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून (Municipal Administration) मान्सून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. लोकांच्या पसंतीला उतरलेल्या मुंबई महा मेट्रोने (Mumbai Metro) प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायक प्रवासासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

मेट्रो आणि मोनो फेऱ्यांची वाढ

पावसाळ्याच्या काळात मेट्रो प्रवाशांना सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो सह मोनोरेलची सेवा देखील सुरू राहावी यासाठी अत्याधुनिक मान्सून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पावसात पूरस्थिती सारख्या आपत्तीच्या वेळी रस्ते वाहतूक ठप्प होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मेट्रो आणि मोनोच्या फेऱ्यांची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हे आहेत हेल्पलाईन क्रमांक

मुंबई मेट्रो आणि मोनो प्रवासी आपत्कालिन परिस्थितीत १८००८८९०५०५ / १८००८८९०८०८ या हेल्पलाइनद्वारे (Helpline) संपर्क साधू शकतात. त्यासोबतच ८४५२९०५४३४ या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून मोनोरेलच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाशी देखील आपण संपर्क साधू शकतात, असं आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

त्याचबरोबर मुंबई मेट्रो स्थानकांवर ॲनिमोमीटर बसविण्यात आले आहेत. याआधारे वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजता येणार आहे. तसेच मेट्रोने प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेरांच्या माध्यामातून ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे चोवीस तास पाळत ठेवली जाणार आहे.

मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याची तयारी

मुंबई मेट्रो रेल आणि मोनोरेलच्या सेवांमध्ये व्यत्यय आणणारे त्यासोबत धोकादायक ठरणारे फ्लेक्स, होर्डिंग्ज किंवा मोठे बॅनर यांची तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ठिकाणी झाडांच्या फांद्यादेखील छाटल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याची तयारी देखील करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -