Crime : धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेऊन क्रूर पतीने केला पत्नीचा खून

मृतदेहाचे १४ तुकडे केले अन्...


भोपाळ : मध्य प्रदेशातील (MP) भोपाळमधून (Bhopal Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केली असल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर पुरावे लपविण्यासाठी आरोपीने आधी मृतदेह जाळून त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती व्यवसायाने ऑटोचालक आहे. परवाखेडा येथे राहणाऱ्या नदीम या ऑटो चालकाशी सानिया नावाच्या तरुणीचे लॉकडाऊन दरम्यान लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून नदीम सानियाच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून कारची मागणी करत होता. हुंडा न दिल्यानं तो तिचा छळ करत असायचा. इतकेच नव्हे तर नदीम सानियावर संशय घेऊन तिला मारहाणही करायचा. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी तिच्या बहिणीच्या घरी राहू लागली.


काही दिवसांनी नदीमने सानियाला भेटण्यासाठी घरी बोलावले होते. सानिया नदीमला भेटण्यासाठी गेली असता ती पुन्हा परतलीच नसल्याने सानियाच्या कुटुंबियांनी निशातपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सानियाच्या तपसादरम्यान नदीमही बेपत्ता झाल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याचाही शोध घेण्यात आला असता नदीमने सानियाची हत्या केली असल्याचे समोर आले.



आरोपीकडून गुन्ह्याची कबुली


पोलिसांनी नदीमला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सानियाच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्याने आधी तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला. मात्र त्याचे समाधान झाले नसल्याने आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आर्वालिया खंती येथून महिलेची कवटी, पाय आणि इतर अवशेष जप्त केले आहेत.



मुलीचा अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नदीम आणि सानिया यांना दोन महिन्यांची मुलगी होती. अडीच महिन्यांपूर्वी उकळत्या पाण्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूनंतर सानिया आणि नदीमचे नातेही बिघडले होते. त्यामुळे नदीम सानियावर जास्तच संशय घेत होता.

Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे