Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीAir Travel : प्रवाशांसाठी आनंदवार्ता! हवाई प्रवास आता आणखी स्वस्त होणार

Air Travel : प्रवाशांसाठी आनंदवार्ता! हवाई प्रवास आता आणखी स्वस्त होणार

मुंबई : जून महिना सुरु होताच अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. अशातच हवाई प्रवाशांसाठीही एक आनंदाची माहिती समोर येत आहे. गॅस सिलेंडरप्रमाणे आता लवकरच हवाई प्रवास देखील स्वस्त होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी जेट इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत कमालीची घट केल्याचे दिसून येत आहे. देशांतर्गत मार्गांवर विमान उड्डाण करण्यासाठी वापरण्यात येणारे हे तेल तब्बल १ लाख रुपयांच्या खाली आले आहे. इतकेच नव्हे तर देशातील चार महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करणाऱ्या विमानांच्या इंधन दरातही मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे विमान कंपन्यांचा खर्च कमी होणार असल्यामुळे विमान कंपन्यांचे भाडेही कमी होणार आहेत.

मुंबईत सर्वात कमी दर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये जेट इंधनाच्या किमती सर्वात कमी आहेत. एटीएफ किमतीत प्रति किलोलिटर ६,३३९.४३ रुपयांनी घट झाल्यामुळे किंमत ८८,८३४.२७ रुपये प्रति किलोमीटर झाली आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठे महानगर असलेल्या चेन्नईमध्येही जेट इंधनाच्या किमती सर्वात मोठी कपात करण्यात आली असून दर ९८,५५७.१४ रुपयांवर आले आहे. सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई ही तीन महानगर वगळल्यास केवळ कोलकातामध्ये एटीएफचे दर एक लाखाच्या वर आल्याचे आयओसीएलने म्हटले आहे .

आंतरराष्ट्रीय उड्डाण स्वस्त होणार

आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही जेट इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर ५१.१ डॉलरने स्वस्त झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -