Thursday, July 25, 2024
Homeक्राईमपोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीला उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीला उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय. सध्या पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना पुण्यातच आणखी एक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (१५) मुलीने मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होती. आणखी गंभीर बाब म्हणजे तिच्यासोबत तिचे वडीलही सोबतीला होते. मालवाहतूक टेम्पो घेऊन जात असताना सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगात चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असणारा महिंद्र बांडे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मालवाहू पिकअपने दुचाकीसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेले. इतकेच नव्हे तर अपघात झाल्यानंतर पीडितांची मदत न करता त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, याप्रकरणी मयत मेमाणे यांचा भाऊ सतीश मेमाणे यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून आरोपी अल्पवयीन मुलीसह तिचे वडील संतोष लेंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिक्रापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -