Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीNagpur News : धक्कादायक! तलावात बुडून तिघांचा मृत्यू

Nagpur News : धक्कादायक! तलावात बुडून तिघांचा मृत्यू

कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये बुडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी निघालेली एसडीआरएफच्या (SDRF) जवानांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वेंगुर्ले बंदरातही बोल उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अशा घटना ज्वलंत असतानाच नागपुरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

नागपुरमधील उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक लहान मुलगा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या वाठोडा परिसरातील तिघेजण गुरुवारी दुपारच्या सुमारास डबा पार्टी करण्यासाठी मटकाझरी तलावाजवळ गेले होते. पार्टीदरम्यान, हे तिघेही तलावात बुडाले. आज सकाळी या तिघांचे मृतदेह सापडले असता याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, डबा पार्टी जीवावर बेतल्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -