मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल प्रवाशांचे शुक्रवारी हाल झाले. शुक्रवारी सकाळी पीक अवरला कर्जत, कसाऱ्याहून मुंबईत दाखल होणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. तर बहुतांशी रेल्वे स्थानकांवरील इंडीकेटरवर लोकल दाखल होण्याची वेळ व प्रत्यक्ष लोकल येणारी वेळ यात काही ताळमेळच लागत नव्हता. त्यामुळे फलाटांवरील सर्व यंत्रणांचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती.
मध्य रेल्वेने शुक्रवारच्या ब्लॉकसाठी १६१ लोकल फेऱ्या रद्द करत प्रवाशांना महत्त्वाच्या कामासाठीच लोकलने प्रवास करण्याचे आवाहन केले होते. ब्लॉकला पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी आणि बेस्टनेही अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय स्कूल बसनेही सार्वजनिक वाहतूक सेवेला प्राधान्य दिले होते. पण एकाच वेळी अनेक वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी होणार आणि त्यामुळे इप्सित ठिकाणी जाण्यास उशिर होईल असा विचार करून प्रवाशांनी लोकलला प्राधान्य दिल्याने प्रवाशांचे हाल झाले. कर्जत, कसारा, पनवेल येथून मुंबईत दाखल होणाऱ्या लोकलला सकाळी आणि दुपारी गर्दी कायम होती. दुपारी २ ते ४ या काळात लोकलला गर्दी कमी असली तरी या काळात फॅमिलीसोबत बाहेर पडलेल्या प्रवाशांना ब्लॉकचा किंचित का होईना फटका बसला.
कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ वर सीएसएमटी येथे जाण्यासाठी १.३८ ची लोकल लावण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र २.५९ वाजता लोकल फलाटावर आली. त्यानंतर २.५४ ची सीएसएमटी लोकल लावण्यात आली. प्रत्यक्षात मात्र फलाटावर एसी लोकल दाखल झाली. त्यामुळे नंतर दाखल होणाऱ्या लोकलची प्रवाशांना वाट बघावी लागली.
दरम्यान, ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरूवात झाली असून रविवारी २ जून रोजी दुपारी साडेबारा पर्यंत हे काम चालणार आहे. मध्यरात्री काम सुरू झाल्याने पहाटेपासून लोकल सेवा खोळंबली होती. ट्रेन्स जवळपास ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. आधीच उकाड्याने त्रासलेले प्रवासी या गोंधळामुळे वैतागून गेले होते. अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने रेल्वेचा भार इतर वेळेपेक्षा कमी होता. ब्लॉकची कामे सुरू असल्याने लोकल डोंबिवली, कल्याण दरम्यान एका मागे एक थांबल्या होत्या. सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड स्थानकात तुरळक गर्दी होती. हार्बरवरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…