Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाR Praggnanandhaa : जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर मात करत प्रज्ञानंदचा मोठा विजय!

R Praggnanandhaa : जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर मात करत प्रज्ञानंदचा मोठा विजय!

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदची यशस्वी कामगिरी

स्टॅव्हॅन्गर : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या फिडे विश्वचषक स्पर्धेत सर्वांचे डोळे केवळ १७ वर्षांचा भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदवर (R Praggnanandhaa) लागले होते. अंतिम फेरीत त्याचा सामना जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनशी (Magnus Carlsen) होणार होता. सर्वांना खूप आशा असताना प्रज्ञानंदचा पराभव झाला, त्याला उपविजेतेपद मिळाले. मात्र, आता भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने स्टॅव्हॅन्गर येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत (Norway Chess 2024) मोठी कामगिरी केली आहे. आपल्या पराभवाचा वचपा काढत प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करत या दिग्गज खेळाडूवर पहिला क्लासिकल विजय नोंदवला आहे.

आर प्रज्ञानंद हा क्लासिकल बुद्धिबळात कार्लसनला पराभूत करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. या विजयासह, प्रज्ञानंद तिसऱ्या फेरीअखेर ९ पैकी ५.५ गुणांसह नॉर्वे बुद्धिबळ २०२४ स्पर्धेत मध्ये सर्वात आघाडीवर आहे. तर, झालेल्या पराभवामुळे मॅग्नस कार्लसनची स्पर्धेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

तीन फेऱ्यांनंतर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंचे गुण
१. आर प्रज्ञानंद – ५.५
२. फॅबियो कारुआना – ५
३. हिकारू नाकामुरा – ४
४. अलीरेझा फिरोझा – ३.५
५. मॅग्नस कार्लसन – ३
६. डिंग लिरेन – २.५

१८ वर्षीय प्रज्ञानंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला त्याच्याच देशात पराभूत केले. पांढऱ्या मोहरांसह खेळताना प्रज्ञानंज्ञने गेल्या वर्षीच्या फिडे विश्वचषक विजेत्या कार्लसनचा निकराच्या लढतीत पराभव केला. यासह, भारतीय ग्रँडमास्टरने स्पर्धेच्या खुल्या विभागात आघाडी मिळवली आहे.

“कार्लसनने डिवचणारी सुरूवात केली होती. मी म्हटलं, त्याला निकराची लढत द्यायची आहे, नाहीतर तो काहीतरी वेगळं खेळला असता. माझी अजिबात हरकत नव्हती. आमची स्पर्धा सुरू होती आणि पुढे काय होतं हे पाहू.” असं प्रज्ञानंदने विजयानंतर इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -