सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा...

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग ॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥ परनिंदा टाळावी । स्वत:कडे दृष्टि वळवावी ॥ गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥ जेथे जेथे जावे । चटका लावूनच यावे ॥ याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥ देहाचे दु:ख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥ अभिमान नसावा तिळभरी। निर्भय असावे अंतरी ॥ जे दु:ख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥ देह टाकावा प्रारब्धावर। आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥ मी असावे रामाचे । याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥ प्रपंचातील सुखदु:ख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावे रघुनाथा ॥ आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥ दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥ कोणास न लावावा धक्‍का । हाच नेम तुम्ही राखा ॥ एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्भाव धरी ॥


राम ज्याचा धनी । त्याने न व्हावे दैन्यवाणी ॥ नका मागू कुणा काही । भाव मात्र ठेवा रामापायी ॥ वाईटांतून साधावे आपले हित । हे ठेवावे मनी निश्चित ॥ भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण॥ म्हणून भक्ति व नाम । याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान ॥ परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण । त्यातच त्यास पाहावे आपण ॥ सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती । खऱ्या विचारांची जोडेल संगति । व्यवहारातील लाभ आणि हानि । मनापासून आपण न मानी ॥ मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी ॥ सुखाने वर्तत जावे जनी ॥ एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा ॥ रामाविण उठे जी जी वृत्ति । त्यासी आपण न व्हावे सांगाती ॥ मी रामाचा हे जाणून । वृत्ति ठेवावी समाधान ॥ धन्य मी झालो । रामाचा होऊन राहिलो । ही बनवावी वृत्ति । जेणे संतोषेल रघुपति ॥ वृत्ति बनविण्याचे साधन । राखावे परमात्म्याचे अनुसंधान ॥ शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति तशी नाही बनली ॥ विषयाधीन जरी होय वृत्ति। तरी दुरावेल तो रघुपति ॥ संतांची जेथे वस्ती । तेथे आपली ठेवावी वृत्ति ॥ सतत विवेक अखंड चित्ती। रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परम प्राप्ति ॥ नामामध्ये ऐसी सत्ता । जेणे जोडे रघुनाथा ॥ नामापरते न मानावे हित । हेच आजवर सांगत आलो सत्य ॥ भगवंताला आपले होणे आवडते फार । श्रीरामनामी राहावे खबरदार॥


तात्पर्य : रघुनाथस्मरणात असावे आनंदात । तेथे न चाले कोणाची मात॥

Comments
Add Comment

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव

परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  परमेश्वर हा विषय समजला नाही, तर हे जग सुखी होणे शक्य नाही, हा जीवनविद्येचा

तणावात जगण्यापेक्षा हसत जगा

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य हल्ली बहुतेक सगळ्यांनाच ताणतणाव असतात. असा माणूस शोधूनही सापडणार नाही ज्याला

भगवान परशुराम

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी  ऋषिश्रेष्ठ परशुरामांना खरी अंतरिक ओढ निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे

माँ नर्मदा... एक अाध्यात्मिक परिक्रमा!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे भारत हा प्राचीन संस्कृतीचा देश आहे. येथे असंख्य देवी-देवता, झाडे, वनस्पती, प्राणी आणि