RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! 'या' खासगी बँकांना भरावा लागणार दंड

जाणून घ्या नेमकं कारण काय


मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होताच आरबीआयने (RBI) नवी नियमावली जाहीर केली होती. खातेदारांसह इतर खासगी बँकांसाठीही सेंट्रल बँकेकडून (Central Bank) काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सूचनांचे पालन न करणाऱ्या बँकांविरुद्ध आरबीआयने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे (RBI Action). दोन खासगी बँकांकडून कार्यालयीन खाती अनधिकृतपणे चालवणे आणि मध्यवर्ती बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याचे आरबीआयला आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना कठोर दंड ठोठावण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँकेकडून दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांमध्ये येस बँक (YES Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI Bank) या बँकांचा समावेश असून आरबीआयने त्यांच्यावर तब्बल १.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे सेंट्रल बँकेच्या सूचनांचे पालन न करणे या बँकांना चांगलंच महागात पडलं आहे.



आयसीआयसीआयला किती दंड?


आरबीआयने २१ मे २०२४ रोजी काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आयसीआयसीआय बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ च्या कलम ४६ (४)(१) सह कलम ४७A (१)(C)च्या तरतुदींनुसार आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी हा दंड ठोठावला आहे', असे आरबीआयने सांगितले.



येस बँकेवर इतका दंड


आरबीआयने १७ मे रोजी येस बँक लिमिटेडला बँकांमधील ग्राहक सेवा आणि अंतर्गत/कार्यालयाचे अनधिकृत ऑपरेशन या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४६ (४)(१) सह कलम ४७A(१)(C) च्या तरतुदींनुसार आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी हा दंड ठोठावला असल्याचे आरबीआयने सांगितले.


दरम्यान, या दोन्ही भारतातील खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँका आहेत. पण, अलीकडच्या काळात या बँकांना काही आव्हानांचा सामना करावा लागला आहे. आयसीआयसीआय बँकेला अनुत्पादित कर्जे (एनपीए), प्रशासकीय समस्या आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तर येस बँकेला आर्थिक संकट आणि ग्राहक आपले खाते बंद करत असल्यामुळे या समस्यांचा सामना करावा लागला आहे.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर