गोव्यात मान्सूनचा अनुभव आणि पावसाळ्यात साजरे होणारे गोव्यातील सण

बहावा वृक्ष बहरला की पावसाचं आगमन झालंच म्हणून समजा. गोव्यातल्या पावसाची तर मजाच न्यारी. फेसाळणारा समुद्र, हिरवागार शालूने जणू नटलेला निसर्ग, यामध्ये भर पडते ती इथल्या सणांची. विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारे गोव्यातील सण हे इथल्या मान्सूनचं खरं आकर्षण असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, या लेखात आपण पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या अशा काही सणांची माहिती घेऊ...


साओ जोआओ महोत्सव: गोव्यातील सर्वात लोकप्रिय मान्सून उत्सवांपैकी एक म्हणजे साओ जोआओ महोत्सव. हा उत्सव राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या नावावरून साजरा केला जाणारा हा सण जल केंद्रित आहे. विहिरी, नद्या आणि तलावांमध्ये उडी मारून जलक्रीडा करत हा सण साजरा केला जातो.


साओ जोआओ महोत्सव दरवर्षी २४ जून रोजी गोव्यात साजरा केला जातो. पाण्यात तरंगणारे रंगीबेरंगी फ्लोट्स, पारंपारिक संगीत, स्थानिक लोक आणि पर्यटक एकसारखे दिसणारे कोपल्स (फुलांची माळा) घालतात, यामुळे उत्सवाच्या उत्साहात भर पडते.



सांगोड उत्सव: मान्सून उत्सवाला सुरुवात करणारा सांगोड उत्सव, गोव्यातील मासेमारी करणाऱ्या समुदायाद्वारे साजरा केला जाणारा पारंपारिक बोट उत्सव आहे. दरवर्षी, २९ जून रोजी, गोव्यात सेंट पीटर आणि सेंट पॉल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. सेंट पीटरचं या समुदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणापासूनच 'रॅम्पन' मासेमारीच्या हंगामाची सुरूवात होते, आपल्या लाडक्या दर्या राजाचे आशीर्वाद घेतले जातात, विधीवत पूजा करून पुढील वाटचालीसाठी बोटी तयार केल्या जातात.


छोट्या नाव एकत्र आणून त्या एकमेकांसोबत जोडल्या जातात. नारळाच्या झावळ्या, फुले आणि रंगीबेरंगी फुग्यांनी या छोट्या नावांना सजवले जाते. चर्चची प्रतिकृती या नावेच्या मध्यभागी उभारली जाते. यावेळी हा मच्छीमार करणारा समुदाय आपल्या पारंपारिक लोकनृत्याने, संगीताच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.



चिखल कालो महोत्सव: "द मड फेस्टिव्हल" म्हणून ओळखला जाणारा धार्मिक सण, गोव्यात पावसाळ्यात विशेषतः जूनमध्ये साजरा केला जाणारा पारंपारिक उत्सव आहे. पोंडा येथील मार्सेल गावातून उगम पावलेला, हा अनोखा उत्सव देवकी कृष्ण मंदिरास केंद्रस्थानी ठेवून साजरा केला जातो. हा उत्सव भगवान कृष्ण आणि त्याची आई देवकी यांना समर्पित आहे.


सणाची नेमकी उत्पत्ती अस्पष्ट असली तरी, गावकरी दरवर्षी मोठ्या उत्साहाने त्याचे स्मरण करतात. या उत्सवात सहभागी आनंदाने चिखलात लोळतात आणि पारंपारिक खेळांमध्ये मंत्रमुग्ध होऊन जातात. देवकी कृष्ण मंदिराशेजारी असलेले मैदान उपस्थितांचे स्वागत करत गर्दीच्या रिंगणात रूपांतरित होते.



टॉक्सेचेम उत्सव: या विस्तृत मेजवानीच्या केंद्रस्थानी एक लक्ष्यवेधक प्रथा आहे जिथे भक्त सेंट ॲन यांना आदर म्हणून काकडी अर्पण करतात. हंगामात भरपूर प्रमाणात काकडी तयार होते त्यामुळे या हंगामात हा सण साजरा केला जातो असे म्हटले जाते. गोव्यात हंगामातील पहिली कापणी ही काकडीची केली जाते.


ख्रिस्ती धर्मगुरूंच्या निर्देशानुसार, लोक दोन काकड्या आणतात. या काकड्या मदर मेरीच्या पुतळ्याजवळ ठेवतात. उत्सवादरम्यान भेट दिलेल्या या काकड्या नंतर स्थानिक समुदाय, पुजारी आणि जवळपासच्या गावांमध्ये वाटल्या जातात. काहीजण ताज्या काकड्यांचा आस्वाद घेण्यास प्राधान्य देतात, तर काहीजण सॅलडमध्ये समाविष्ट करतात.


बोंडेरम उत्सव: मान्सूनच्या पावसाने निसर्ग चिंब होत असताना, दिवारचे नयनरम्य बेट बोंडेरम महोत्सवाने न्हाऊन निघते. ऑगस्टच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगीत परेड. ज्यामध्ये गावातील प्रतिस्पर्धी पाड्यांमध्ये हास्य विनोद केला जातो.


प्रत्येक गट रंगीबेरंगी झेंड्यांनी सजलेले चित्ररथाचे प्रदर्शन करतो. सुंदर चित्ररथासाठी बक्षीस आयोजित केलेले असते त्यामुळे चित्ररथांची स्पर्धा असते. या उत्सवाला पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, ते संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.



अशाप्रकारे गोव्याचा मान्सून म्हणजे निव्वळ बरसणाऱ्या पावसाच्या सारी एवढाच मर्यादित नाही. गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवणारे हे उत्सव खऱ्या अर्थाने येथील मान्सूनचं आकर्षण आहे. त्यामुळे, तुमच्या बॅग पॅक करा, तुमचा आवडत्या सणाचा पोशाख घाला आणि गोव्यातील या पावसाळी उत्सवांच्या जादूमध्ये मग्न व्हा.

Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण