मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता राज्यातील पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहेत. या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी विशेष लक्ष दिले असून पुण्यात उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाने अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी दोन दिवसांत पोलिस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने १३१ ठिकाणी धाडी टाकून ४३ बारवर कारवाई केली.
या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २१ वर्षांखालील तरुणांना दारू विकल्याप्रकरणी दोन कारवाया, टेरेस रूफटॉपमध्ये अवैध दारू पुरवठा केल्याप्रकरणी तीन कारवाया आणि उशिरापर्यंत महिला वेट्रेसद्वारे दारूसेवा पुरविणाऱ्या तीन ठिकाणांसह अन्य कारवाया करण्यात आल्या आहेत.
तर शहरात करण्यात आलेल्या २३ कारवाया उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरीत्या राबविण्यात आल्या. या विशेष तपासणी मोहिमेत एकूण २३ बारवर विविध स्वरूपाचे नियमभंग केल्याप्रकरणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये २१ वर्षाखालील व्यक्तींना मद्यविक्रीच्या २ कारवाया, विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री व परवाना कक्षाबाहेर मद्यविक्रीच्या ११ कारवाया, तर ऑर्केस्ट्रा बारमध्ये उशिरा महिला नोकर काम करताना आढळल्याने १० लेडीज बारवर कारवाई करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…